अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांना तीन दिवसाच्या आता पिक नुकसानीची तक्रार करावी लागणार आहे त्याच शेतकऱ्यांना नकसान भरपाई मिळणार आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस झाला पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे कोरडे पडली होती.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टंकरे सुरु करावे लागतील अशी परिस्थिती झाली होती, अवकाळी पावसामुळे पिकांना आधार मिळाला.
काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकाचे थोडेफार नुकसान झाले तर काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणत पिकाचे नुकसान झाले.
नुकसान भरपाईसाठी या टोल फ्रीवर करा तक्रार
वादळ वाऱ्यामुळे बीड तालुक्यातील काही गावातील ज्वारी आडवी झाली अवकाळी पावसाचा फटका काही गावांना बसला आहे
राज्यातील अनेक भागात कापूस, मक्का, तूर कांदा या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यास या संबंधित तक्रार भारतीय कृषी विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-४१९-५००४ येथे संपर्क करा.
तसेच pikvima@aicofindia.com या ईमेल वर हि तक्रार केली जाऊ शकते नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे अन्यथा तक्रारीची दाखल विमा कंपनी घेत नाही.