खुशखबर…! २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी अतिवृष्टी अनुदान जमा

राज्यातील २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

सोयगाव तालुक्यामध्ये २०२२ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २३ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रशासनाने मदतीचे ४० कोटी १४ लाख रुपये अनुदान वर्ग केले असून 3 हजार ११ शेतकऱ्यांना मात्र विविध कारणामुळे अनुदानाची वाढ पहावी लागत आहे.

सोयगाव तालुक्यात सप्टेंबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये २६ हजार ९५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

शासनाने ऑनलाईनप्रणालीद्वारे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली होती. २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी उद्भवून नुकसानीची मदत पदरात पडून घेण्यासाठी अनेकदा संबधित तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करावी लागली.

२०२२ चे अतिवृष्टी अनुदान आले

सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांना आता मिळवण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबर २०२३ मध्ये हि रक्कम उपलब्ध झाल्यानतर २६ हजार 55 पैकी २३ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यावर ४० कोटी १४ लाख रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

उर्वरित 3 हजार ११ शेतकऱ्यांपैकी 1 हजार 300 शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नाही तसेच त्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग झाला नाही.

1 हजार ७११ शेतकऱ्यांच्या नावात दुरुस्ती असल्याने टी यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून दुरुस्तीसाठी तहसीलच्या पोर्टलवर परत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी दुष्काळ निधीसाठी मागणी करण्याचे सांगिलते

सोयगाव तालुक्यात या वर्षी खरीप हंगामातील ४२ हजार ३२८ हेक्टरवरील ३२ हजार ९५४ शेतकऱ्यांचे नुसकान झाले असून तालुक्यात अतिगंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

शासनाच्या मदतीसाठी तालुक्यातील ३२ हजार ९५४ पात्र ठरले आहे

मदतीच्या अनुशंगाने या शेतकऱ्यांच्या पिक निहाय याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्या असल्याने तालुक्यात निधी मंजूर झाला नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment