मोफत ई रिक्षा योजना या योजनेंतर्गत राज्यातील दिव्यांग प्रवर्गातील नागरिकांना मोफत ई रिक्षा मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे चालू आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात त्यातील एक योजना म्हणजे ई रिक्षा वाटप योजना ई रिक्षाद्वारे दिव्यांगाना विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी उन्नती साधता येणार आहे.
राज्यात असे अनेक तरुण युवक आहे कि जे अपंग आहे व त्यांना दुसरे कोणतेही अवजड काम करता येत नाही
त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबावर अवलंबून राहावे लागते.
आता या युवकांसाठी देखील शासन विविध योजना राबवत आहे त्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यास एक मार्ग मोकळा झाला आहे.
दिव्यांगांना मोफत मिळणार ई रिक्षा
मोफत ई रिक्षा योजना अंतर्गत दिव्यांग युवकांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करता येणार आहे त्यासाठी शासन त्यांना मोठे सहकार्य करणार आहे.
४० टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये देखील अधिकच दिव्यांग असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
या ई रिक्षाच्या माध्यमातून तुम्ही खाद्य पदार्थ विक्री, पूजेचे साहित्य विक्री, फळे, भाजीपाला विक्री आदि विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करू शकता.
ई रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आतपर्यंत ८३७ जणांचे अर्ज आले आहे त्या अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे.
कुठे करणार अर्ज व काय कागदपत्रे लागणार
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मार्फत दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेसाठी अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी ५ जानेवारी मदत देण्यात आली होती
त्यात आता वाढ करून ८ जनावेरी पर्यंत अर्ज अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे लाभार्थ्यांनी ८ जानेवारी पर्यंत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कार्यालात जाणून अर्ज करावेत.
लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार
- लाभार्थी दिव्यांग प्रमाणपत्र
- २.५० लाखाच्याआतील उत्पन्नाचा दाखला
- व्यवसाय व वाहनाबाबत बंधपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
आदि कागदपत्रासह संबंधित विभागाकडे अर्ज करावा.