व्यवसायसाठी कर्ज योजना या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
व्यवसाय करण्यसाठी शासनाच्या विविध योजना आहे या योजनाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊन विविध व्यवसाय सुरु करून शकता.
शासनाच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी सर्वात कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून या योजनाचा काही मर्यादित समाजासाठी उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना खरे तर ओबीसी युवक, महिला यांच्यासाठी राबविल्या जात आहे पण या योजनाची माहिती नसल्याने या योजना कागदावरच आहे.
आता तर या महामंडळामार्फत राज्य शासनाने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन उपकंपन्याही कार्यान्विंत झाल्या आहे.
या दोन्ही महामंडळासाठी प्रत्येकी ५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे मार्च पर्यंत हि रक्कम सर्व व्यवसायिकांना वाटप करण्यात येणार आहे.
कोणत्या आहे या तीन व्यवसायसाठी कर्ज योजना
ऑनलाईन कर्ज योजना
राष्ट्रीयकृत, नागरी, सहकारी, बँकाकडून घेतलेल्या कर्जाच्या दरमहा नियमित परतफेड केलेल्या हप्त्यावरील बारा टक्क्यापर्यंत व्याजाच्या व पाच वर्षापर्यंतच्या मुदती कर्जावरील व्याज रक्कमेचा परतावा लाभार्थीस ऑनलाईन पद्धतीने बचत खात्यात महामंडळामार्फत जमा करण्यात येतो.
तथापि लाभार्थीनी बँकाकडे कर्जासाठी अर्ज भरण्यापूर्वी महामंडळाचे प्रमाणतपत्र घेणे अनिवार्य आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना १० लाखापर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजना १० ते ५० लाखापर्यंत.
ऑफलाईन कर्ज योजनेतर्गत थेट कर्ज योजन
गुरव व लिंगायत समाजातील गरुजूंनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑफलाईन कर्ज योजनेच्या अर्जासाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ दुसरा मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजीहायस्कूलच्या खोकडापूर, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यलयीन वेळेत संपर्क करावा.
माहिती स्वयसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना
महिला बचत गटासाठी माहिती आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येईल प्रथम टप्प्यात ५ लाखापर्यंत कर्ज घेण्यास मान्यता व या कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्प्यात दहा लाख रुपयाचे कर्ज घेण्यास पात्र आहे.