राज्यातील पहिल्या टप्प्यात या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत मिळणार, जे अल्पभूधारक नाहीत त्यांना देखील मिळणार लाभ पहा सविस्तर माहिती.
राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे अशामध्ये महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
खरीप हंगाम 2023 शेतकरी बांधवांसाठी खूपच वाईट गेलेला असून अनेक भागात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकरी बांधवांवर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे.
सुरुवातीला 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून उर्वरित तालुक्यातील ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे त्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या निकषानुसार मदत दिली जाणार असल्याची माहिती या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात या ४० तालुक्यात दुष्काळ ३ हेक्टर पर्यंत मदत मिळणार
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले होते.
त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निर्देशानुसार २ हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवाना याचा फायदा होणार आहे.
जे शेतकरी अल्पभूधारक होते त्यांना या योजनेचा जास्त लाभ मिळत नव्हता आता मात्र जे अल्पभूधारक शेतकरी नाहीत त्यांनाही हि मदत मिळणार आहे.