पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज अनुदान मिळणार आहे त्यासाठी गायीच्या दुधाला ५ रुपया प्रती लिटर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे जिल्ह्याला महिनाभर दररोज जवळपास २० लाख 53 हजार रुपये अनुदान स्वरुपात मिळणार आहे.
यासाठी दुभत्या गायी मालकांना अनेक अटी व शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे मागील काही वर्षापासून निसर्गाची अकृपा सुरु असल्याने शेती उत्पादनात शेतकऱ्यांच्या खाती फारसे काही लागत नाही.
त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दुध व्यवसायाचा आधार आहे शेतीला पूरक असा हा व्यवसाय चांगला वाढत असलेला असताना सध्या मात्र दुधाचे दर कोसळले आहे.
त्यामुळे प्रती लिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी दुध उत्पादक आणि शेतकरी संघटना विविध संघटनेचे पदअधिकारी राजकीय लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली होती.
त्यानंतर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान गाईच्या दुधाला देण्याचा शासन निर्णय शासने जाहीर केला आहे.
असे आहे ५ रुपये अनुदानाचे स्वरूप
सहकारी, खाजगी, दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे
यासाठी प्रकल्पांना दुग्धविकास आयुक्ताकडे अर्ज करावा लागणार आहे
3.५ फेट व ८.५ एसएमएफस गुणप्रतीच्या दुधास २७ रुपये ऑनलाईन स्वरुपात अदा करणे आवश्यक आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे ५ रुपये अनुदान वितरीत होणार आहे.
यासाठी विशेष बँक सोफ्टवेअर कार्यान्वित करून डीबीटी त्या बँक खात्यास उत्पादकाचे आधार व पशूचे आधार लिंक करणे आवश्यक आहे.