शेतकऱ्यांची दिवाळी गोड! या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ४१२ कोटी पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वी तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पिक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार जमा केले जाणार आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये समजून घेऊया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्या सर्वांनाच माहिती की यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी तसेच ढगफुटी व पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सोयाबीन, कापूस, तुर, मुंग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता खरिपाच्या पिक विमाधारक शेतकऱ्यांकरिता 25 टक्क्यांची पिक विमा अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनाही पीक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. २५ टक्के अग्रिम रक्कम

शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार

या अनुसार अग्रीम 412.30 कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबी अंतर्गत जिल्ह्यातील जिल्ह्यामधील सर्व मंडळामधील पिक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा (Pik Vima 2024) रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स कंपनीस पिक विमा देण्यात आलेले आहे.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची एकूण नुकसान भरपाई पैकी 25% नुकसान भरपाई अग्रीम रक्कम (Pik Vima 2024) वितरित करण्यात येणार आहे
  • याकरता शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्याकरता मोठी मदत होणार आहे
  • नुकसानीचा अहवाल प्रशासनाद्वारे राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे

थेट खात्यात जमा होणार मदत

हवामानावर आधारित पिक विमा ची रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता पिक विमा कंपनीस दिवाळीपूर्वी (Pik Vima 2024) एकूण विम्याच्या मदतीच्या 25 टक्के अक्रम देण्याच्या आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Leave a comment