घरकुल यादी आली प्रधानमंत्री घरकुल योजना, इंदिरा गांधी घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेच्या धर्तीवर आता ओबीसी घटकांसाठी सरकारने मोदी घरकुल योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १५ हजार ९६३ ओबीसींना घरकुले मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना हाती घेण्यात आली आहे. शासनाकडून विविध घटकांतील लाभार्थींसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर आता ओबीसींसाठी मोदी आवास योजना हाती घेण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक व ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांनी या योजनेतून आलेल्या उद्दिष्टांचे तालुकानिहाय वाटप केले आहे. घरकुल यादी आली
या योजनेतून जिल्ह्यातील १५ हजार ९६३ ओबीसींना हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामपंचायतींकडून पंचायत समिती व पंचायत समितीकडून जिल्हा ग्रामविकास यंत्रणेला हे प्रस्ताव मागवून घेतले जाणार आहेत. ही सर्व प्रक्रीया तातडीने करण्याचे आदेश श्री. पाठक यांनी दिले.
तालुकानिहाय घरकुले यादी
- अंबाजोगाई १५६०
- आष्टी १३०५
- बीड १३५८
- धारुर ११३८
- गेवराई २३४०.
- केज २१४२.
- माजलगाव १४३३.
- परळी १९५४.
- पाटोदा ६२२.
- शिरूर कासार १५२९.
- वडवणी ५५४
एकूण १५९६३.