आपली चावडी जमीन कोणी घेतली कोणी विकली बघा मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात आपली चावडी या विषयी माहिती बघणार आहोत,

मध्ये तुम्ही तुमच्या गावातील जमिनीचे किती व कोणी व्यवहार केले याची माहिती तुमच्या कशा प्रकारे पाहू शकता हे पाहणार आहोत.

शेतकरी मित्रानो या आपली चावडीच्या माध्यमातून तुम्ही तुमचीच नव्हे तर इतर व्यक्तीची देखील जमीन या ठिकाणी पाहू शकणार आहे.

यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे व तुम्ही कशा प्रकारे तुमच्या गावातील सर्व शेत जमिनीची माहिती तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता याची सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

आपली चावडीची संपूर्ण माहिती

मित्रानो शेती हा विषय म्हंटला कि शेतकऱ्यासाठी तो खूप मोठा आहे त्यामुळे आपण या लेखात आपली चावडी या विषयी माहिती जाणून घेणार आहोत

यामध्ये तुम्हाला हि माहिती जर वाचून समजली नसेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो पहा.

मित्रानो ग्रामीण भागामध्ये म्हणजेच गावामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या दिवशीच्या आधी एकदिवस अगोदर गावामध्ये दवंडी द्यावी लागते आणि जो काही निर्णय होणार आहे त्या संदर्भात गावातील नागरिकांना सूचित केले जाते.

सर्व साधारणपणे गावामधील एखाद्या थंड किंवा स्वछ ठिकाणी हि सभा भातावली जाते.

गावातील प्रत्येक निर्णय या चावडीवर घेतला जातो यामध्ये सर्व नागरिकांच्या प्रश्नांचे व हिताचे निराकरण केले जाते.

असे चेक करा मोबाईलवारून जमिनीचे सर्व व्यवहार

  • तुमच्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम हे अप्लिकेशन ओपन करा.
  • आणि गुगल मध्ये टाका भूमीअभिलेख bhumiabhilekh.
  • Maharashtra government revenue department म्हणजेच महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • या ठिकाणी आपली चावडी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा कॅपचा कोड टाका आणि आपली चावडी पहा या बटनावर क्लिक करा.

जेव्हा तुम्ही वरील माहिती टाकल आणि सबमिट कराल त्यावेळी तुमच्या गावातील संपूर्ण जमीनच्या व्यवहाराची माहिती तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.

फेरफार नंबर, फेरफार प्रकार, फेरफार दिनांक, हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, सर्वे किंवा गट नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

शासनाच्या आपली चावडी या वेबसाईटवर बघा जमिनीचे पूर्ण व्यवहार

शासनाची शेतकऱ्यांसाठी एखादी योजना असेल व शेती संबधित कोणती माहिती असेल आणि ती गावातील नागरिकांना द्यायची असेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांना गावात यावे लागते.

ग्रामपंचायत किंवा गावातील चावडीमध्ये हा शासन निर्णय किंवा शासकीय योजनेची माहिती दिली जाते.

ज्यावेळी हि माहिती दिली जाते त्यावेळी प्रत्येक नागरिक चावडीवर येईलच असे नाहीत त्यामुळे काही नागरिकांना या शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती न मिळण्याची शक्यता असते.

याच बाबीच महत्व लक्षात घेवून शासनाच्या महसूल विभागाने आपली चावडी हि संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे.

या माहितीचा काय फायदा होईल

समजा अ आणि ब नावाचे दोन शेतकरी आहेत ज्यांची जमीन शेजारी आहे.

अ हा शेतकरी ब शेतकऱ्याच्या जमिनीशी निगडीत आहे जसे कि शेत रस्ता किंवा इतर बाबी तर अशावेळी ब या शेतकऱ्याने गुपचूप जमीन विकली तर अ या शेतकऱ्यास अडचण येवू शकते.

अशा परिस्थितीमध्ये अ या शेतकऱ्याने जर आपली चावडीवर हि माहिती तपासली तर तर तो ब या शेतकऱ्यावर आक्षेप घेवू शकतो.

Leave a comment