Ladki Bahin Yojana Updates: महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
अलीकडेच दिल्ली सरकारने महत्त्वाकांक्षी योजना महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकीनंतर रक्कम वाढवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये यावर्षी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या कन्या भगिनी योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. परंतू या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात आले की नाही ते कसे चेक करायचे पाहा. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना पैसे चेक कसे करायचे?
- तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा.
- तसेच बँकेच्या तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम विचारू शकता.
- तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली असेल तर बँकेच्या अॅपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? ते पाहू शकता.
लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले होते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुद्दा पार पडला. पण अद्यापही डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. Ladki Bahin Yojana