शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर 20 हजार बोनस देणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आपल्याला कल्पना आहे की, खरिप हंगामात 2024-25 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धानउत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टर 20 हजार रुपये प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय घेतलाय”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. मागच्या वर्षीही दिला होता. यावर्षीही 20 हजार रुपये बोनस देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात नवीन भरती होत नाही. काही होत आहे ती छत्तीसगड आणि ओडिशाची आहे. जे शहिद झाले आहेत, त्यांच्या पाल्यांना वर्ग एकची नोकरी देण्यात आली आहे. राज्याचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी जिथे घटना झाल्या आहेत तेथील पीडितांची भेट घ्यायला गेले आहेत. अजितदादा नाराज अशा बातम्या लावू नये. सहा दिवसाचे अधिवेशन झालं, तीन दिवस मुंबईत अधिवेशन झालं होतं. प्रत्येक 5 वर्षाने निवडणूक होते, तेव्हा छोटे अधिवेशन होत असतं.  सहा दिवसात भरगच्च कामकाज अधिवेशनात केलं आहे, 17 विधेयकं मंजूर करण्याचे काम आम्ही केलंय.  एक विधेयक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक संयुक्त चिकित्सा समिती कडे पाठवलंय.  ॲंटी नक्षल विभागाचा आग्रह होता तेव्हाच मी गृहमंत्री असल्याने मसुदा तयार केला होता. प्रति हेक्टर 20 हजार

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फक्त चर्चा आणि जाब विचारण्याचे काम विरोधकांनी केले. बीड परभणीच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केलेत. सरकारनं घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सरकार करेल. ओळखीचा पाळखीचा असेल मात्र महायुती पाठीमागे घालण्याचे काम करणार नाही. सर्वसामान्यांच्या मागे उभे राहण्याचे काम आम्ही करु. काही लोकांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा आमदारकीचा राजीनामा देऊ बोलले होते, ते पर्यटनासाठी इकडे येऊन जातात. जाऊ द्या मी काही जास्त टीका करणार नाही. पियूष गोयल यांच्या संपर्कात आहोत, कांदा निर्यातीसंदर्भात पाठपुरवठा करतोय. 

लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, वल्गना केल्या जातात त्यामुळे संयुक्त चिकित्सा समितीकडे म्हणणं मांडता यावं त्यामुळे तिकडे पाठवलंय.  सर्वांना आणि संघटनांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. 35 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम 7 हजार, ऊर्जा 4 हजार कोटी रुपये निधी दिलाय.  लाडकी बहिण योजना 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी जाहीर केलाय. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भाला काय दिलं आणि काय देणार याची मांडणी केली आहे. सिंचन आणि प्रकल्पांच्या माध्यमातून परिवर्तन कसं केलं आणि रोडमॅप देखील मांडला आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. प्रति हेक्टर 20 हजार

Leave a comment