नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे महिला किसान योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून हेणार आहेत. चला तर मग बघूया या योजनेसाठी कोण पत्र असेल.
महिला किसान योजना अंतर्गत वरील समाजाच्या महिलांचे जीवनमान उंचावे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मनाचे स्थान मिळावे हा या महिला किसान योजनेचा उद्देश आहे.
केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलाच या महिला किसान योजनेसाठी पात्र असणार आहे.
महिला किसान योजना स्वरूप
महिला किसान योजनांतर्गत महिलांना ५० हजार आर्थिक सहाय्यता दिली जाते. यामध्ये १० हजार रुपये अनुदान तर ४० हजार रुपये ५ टक्के व्याजदराने दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. शेती पतीच्या नावावर असेल किंवा दोघांच्या नावावर असेल अशा वेळी देखील या योजनांचा लाभ मिळू शकतो.
पतीच्या नावे शेतजमीन असेल तर पतीचे प्रतिज्ञापत्र घ्यावे लागते. महिला किसान योजनांतर्गत दिले जाणारे कर्ज हे फक्त शेती व्यवसायासाठीच दिले जाते.
या योजनेसाठी काही महत्वाच्या अटी
- अर्ज सादर करणार्या व्याकतीचा समाज हा चर्मकार असायला पाहिजे.
- अर्ज करणारी व्यक्ति महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
- अर्जदाराचे वय साधारणपणे १८ ते ५० वर्ष येवढे असावे.
- तहसीलदार किंवा त्या समान सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
- ग्रामीण भागासाठी ९८००० व शहरी भागासाठी १२०००० एवढे उत्पन्न असणे गरजेचे.
- अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
अशाप्रकारे वरील सर्व अटी तुम्हाला लागू होत असेल तरच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा रहिवाशी दाखला.
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
- शत जमिनीचा 7/ 12 उतारा.
असा करा अर्ज
तर मित्रांनो आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा लागतो या विषयीची माहिती आपण आता बघूया. महिला किसान योजनेचा अर्ज हा आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची शुल्क न घेता मिळतो.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरून हा अर्ज संबधित कागदपत्रासह जिल्ह्याच्या कार्यलयात सादर करावा.