PM Kisan 19th Installment : पीएम किसानचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच! तारीख आली समोर

PM Kisan 19th Installment : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसानचा १८वा हप्ता दिला आहे. आता १९ वा हप्त्याची वाट शेतकरी पाहत असून तो लवकरच जमा होणार आहे. याबाबत अपेक्षित तारीख समोर आली असून १९ वा हप्त्याचा लाभ नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे.

द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेचे पैसे तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपयांचे दिले जातात. आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले असून १९ वा हप्ता जानेवारीत मिळण्याची शक्यता होती. पण आता तो फेब्रुवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १८ वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला होता. PM Kisan 19th Installment

दरम्यान देशातील शेतकऱ्यांच्या स्थितीवरून संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे. समितीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिफारस करताना, किसान सन्मान निधीची रक्कम वाढविण्याची शिफारस केली आहे. सध्या देण्यात येणाऱ्या रक्कमेत दुप्पट वाढ करण्यात यावी, अशीही शिफारस समितीने केली आहे.

महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान योजना

देशात सुरू असणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये पाठवले जातात. अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रूपये देण्यात येत आहेत. PM Kisan 19th Installment

याआधी ५ आक्टोंबर २०२४ रोजी नमोच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आणि पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता असे ४ हजार रुपये जमा करण्यात आले होते. तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम वाढवायची की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या हाती असून सरकार काय निर्णय घेते, याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment