अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे  गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्सुरन्स ॲपद्वारे पिक  विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना द्या जेणे करून तुम्हाला पिक नुकसानभरपाई मिळू शकेल.

अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामधील गहू हरभरा इत्यादी पिकांची मळणी सुरु असतांना अवकाळी सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

काही शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये गहू जमा करून ठेवलेला आहे तर काहींनी गंजी करून ठेवलेली आहे.

पावसामुळे शेतातील गोळा करून ठेवलेल्या गव्ह्याच्या पेंड्या व गंजी करून ठेवलेला गहू देखील ओला झालेला असल्याने शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान झालेले आहे.

अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकांचे नुकसान

ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडे पिक नुकसानभरपाईसाठी मागणी करता येते.

काही शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात पिक गोळा करून ठेवलेले आहे.

गोळा करून ठेवलेल्या पिकांचे देखील या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी बांधव पिक नुकसानीसाठी दावा करू शकतात.

या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि crop insurance application द्वारे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीस कसे कळवावे जेणे करून तुम्हाल पिक नुकसानभरपाई मिळू शकेल.

अवकाळी पावसामुळे गहू हरभरा नुकसान झाल्यास असा करा ऑनलाईन अर्ज

  • गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये crop insurance application असा कीवर्ड टाकून सर्च करा.
  • crop insurance application इंस्टाल करा.
  • क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन करा.
  • continue without login या पर्यायावर टच करा.
  • crop loss या पर्यायावर टच करा.
  • त्यानंतर crop loss intimation या पर्यायावर टच करा.
  • मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि सेंट otp या पर्यायावर टच करा.
  • तुमच्या मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाकून Verify करा.
  • आता तुम्हाला पिकांविषयी माहिती सादर करायची आहे ज्यामध्ये सीजनमध्ये रब्बी हा पर्याय निवडा. Year मध्ये 2022 हा पर्याय निवडा.
  • Scheme मध्ये pradhan mantri fasal bima yojana हा पर्याय निवडा.
  • State मध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडा.

इतर म्हत्वाची माहिती भरा.

संपूर्ण माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर सिलेक्ट या पर्यायावर टच करा.

पिक विमा भरतांना ज्या ठिकाणी अर्ज सादर केला असेल तो पर्याय निवडावा, जसे कि सीएससी, बँक, शेतकरी स्वतः किंवा मध्यस्थीने.

शक्यतो बरेच शेतकरी बांधव सीएससी सेंटरवर त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करतात त्यामुळे सीएससी हा पर्याय निवडावा.

तुमच्याकडे पिक विमा पावती असेल तर Do you have policy number हा पर्याय चालू करा. पिक विमा पावती वरील पॉलिसी नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि done या बटनावर टच करा. तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर दिसेल त्यावर त्यासमोर दिलेल्या चौकटीत टच करा.

जसे हि तुम्ही टच कराल त्यावेळी तुमच्या पॉलिसीची संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिसेल तुम्ही कोणकोणत्या पिकांचा पिक विमा काढलेला आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिसेल.

ज्या पिकांचे नुकसान झाले असेल त्या पिकासमोर टच करा. Type of incidence यामध्ये अनेक पर्याय दिसतील त्यापैकी excess rainfall या पर्यायावर टच करा.

Date of incidence मध्ये ज्या दिवशी पिकांचे नुकसान झाले ती तारीख निवडा. पिकाची स्थिती कशी आहे standing crop, harvested, cut and spread or bundled condition for drying.

नुकसान झाले त्यावेळी पिक उभे आहे गोळा केलेले आही किंवा पिकांची कापणी करून शेतामध्ये त्याच्या पेंड्या घालून वाळविण्यासाठी ठेवलेले आहे.

ज्या स्थितीत पिक असेल तो पर्याय शेतकरी बांधवानी या ठिकाणी निवडावा.

किती टक्के नुकसान झाले ती टक्केवारी दिलेल्या चौकटीत टाका. फोटो आणि व्हिडीओ काढून अपलोड करा आणि त्यानंतर सबमिट करा.

क्रॉप इन्सुरन्स ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment