सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम : आंतरराष्ट्रीय बाजारात  सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही कमी झाले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात  सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीनमध्ये चढ उतार कायम

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातही चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७३.९४ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे आज कमी होऊन ५८ हजार ४१० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याचा भाव स्थिरावला

सोयाबीन बीज

सोयाबीन बीज

देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनाॅल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे. परिणामी मक्याचे टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a comment