शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट मिळणार ई पिक पाहणीची अट शिथिल

ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसानभरपाईची मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

जे शेतकरी पिक पाहणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनाही सरसकट मदत देऊन ही पिक पाहण्याची अट शिथिल केली जाईल जाणार आहे.

कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांनी दिले आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळणे गरजेचे होते. मात्र यासाठी ई पिक पाहणी करणे गरजेचे होते.

ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी केली नसेल अशा शेतकरी बांधवाना पिक नुकसानभरपाई मिळणार नाही अशी सूचना देण्यात आली होती.

परंतु आता नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी ई पिक पाहणीची अट शिथिल केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना नक्कीच दिलासा मिळाला असेल.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment