जाणून घेवूयात मागेल त्याला शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. magel tyala shettale yojana.
तुमच्या विहिरीला किंवा बोअरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही शेततळे खोदकाम करून त्यामध्ये जलसाठा करू शकता आणि गरजेच्या वेळी पिकांना पाणी देवू शकता.
शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. शेततळे खोदकाम करण्यासाठी पूर्वी ५० हजार रुपये अनुदान मिळत होते. आता मात्र यामध्ये वाढ झाली असून शेततळे खोदकाम करण्यासठी 75000 रुपये एवढे अनुदान दिले जाते.
mahadbt वेब पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते.
अर्ज कसा करावा, पात्रता काय अर्ज करण्यासाठी किती फी लागते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
magel tyala shettale yojana शेततळे शेतकरी पात्रता
या योजनेचे नाव अर्थात मागेल त्याला शेततळे magel tyala shettale yojana असे असल्याने महराष्ट्र राज्यातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यसाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी ६० गुंठे म्हणजे १ एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ती खालीलप्रमाणे आहे.
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कागदपत्रे
जमिनीचा सातबारा
२. आधार कार्ड.
३. जमिनीचा ८ अ उतारा.
४. आधार कार्ड.
वरीलप्रमाणे कागदपत्रे नोंदणी करण्यासाठी आवश्यक असते. मात्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अजून काही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतात.
मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासठी खालील बटनावर क्लिक करा.
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लॉगीन करण्याची पद्धत
एकदा का तुमची महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर नोंदणी झाली कि मग तुम्हाला लॉगीन करून अर्ज करावा लागतो.
लॉगीन करण्याच्या दोन पद्धती आहेत
- वापरकर्ता आयडी.
- आधार क्रमांक.
वापरकर्ता आयडी या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचा युजरआयडी आणि पासवर्ड टाकून लोगीन करावे लागते. जेंव्हा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी करता त्यावेळी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा पासवर्ड आणि युजर आयडी तयार करू शकता.
आधार क्रमांक
जर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड माहित नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या आधार नंबरने सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करू शकता.
तुमचा आधार नंबर सबमिटकेल्यावर त्यावर एक otp पाठविला जातो तो otp दिलेल्या चौकटीत टाकून तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करू शकता आणि शेततळे योजना अंतर्गत शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
मागेल त्याला शेततळे योजना magel tyala shettale yojana अंतर्गत शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- महाडीबीटी वेबपोर्टलवर लॉगीन करा.
- अर्ज करा हि लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- मुख्य घटक म्हणून सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
- बाब या पर्यायामध्ये वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडा.
- उपघटक मध्ये इनलेट आउटलेटसह किंवा इनलेट आउटलेटशिवाय यापैकी एक पर्याय निवडा.
- परिमाण या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे शेततळे हवे आहे तो आकार निवडा.
- सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करून अर्ज जतन करून घ्या.
वरील सर्व प्रोसेस तुम्हाला किचकट वाटत असेल तर शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ खास आपणासाठी बनविलेला आहे.
यामध्ये अर्ज सादर केल्यानंतर २३ रुपये पेमेंट कसे करावे लागते या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. तो व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.