PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मागील 18 वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला आहे. तर पुढील 19 वा हप्ता हा लवकरच वितरित केले जाणार आहे. तुम्ही अर्ज केला असेल तर तो कसा तपासायचा, यादीत नाव कसं तपासायचे? हेच आपण जाणून घेणार आहोत.
19 वा हप्ता कधी येणार?
मीडिया रिपोर्टमध्ये, 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाण्याची अपेक्षा आहे. मात्र सरकारने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. PM Kisan Yojana
लाभार्थी यादी कशी तपासाल?
सर्वप्रथम पीएम किसानच्या : https://pmkisan.gov.in. या अधिकृत वेबसाईटवर जा. नंतर
‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. मुख्यपृष्ठावरील‘लाभार्थी स्थिती’टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा तपशील एंटर करा: तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता.
ऑनलाइन नोंदणी कशी करायची?
सर्वप्रथम अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या.‘नवीन शेतकरी नोंदणी’ वर क्लिक करा.आवश्यक तपशील भरा जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि वैयक्तिक/बँक माहिती. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत तयार करा. एकदा सबमिट केल्यानंतर, मंजूरीपूर्वी स्थानिक प्राधिकरणांद्वारे अर्जाची पडताळणी केली जाईल.
मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?
योजनेसंदर्भात अपडेट्स आणि हप्त्याच्या सूचना प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर पीएम किसान पोर्टलशी लिंक करणे महत्वाचे आहे. OTP-आधारित eKYC पूर्ण करण्यासाठी देखील ही पायरी आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्या. किंवा PM किसान वेबसाइटवर लॉग इन करा https://pmkisan.gov.in.‘अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडा. तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक टाका. पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.