५० हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत

पात्र लाभार्थ्याला या प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत कर्ज मिळणार आहे. या कर्जाची रक्कम ही ५० हजारांपर्यंत असणार आहे. या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे व्याज लाभार्थ्याकडून आकारले जाणार नाही.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटापर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजने बद्दल संपूर्ण माहिती मिलेले.

लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार हा अर्ज लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.

अर्ज कसा करायचा आणि कोणत्या वेबसाईटवर करायचा आणि यासाठी महत्वाची कागदपत्रे काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटापर्यंत वाचा.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना स्वरूप

लाभार्थ्याला जर एखादा उद्दोग सुरु करायचा असेल तर या योजने अंतर्गत लाभार्थ्याला खूप चांगल्या प्रकारे ५० हजार पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. लाभार्थी या योजने अंतर्गत १० हजार, २० हजार आणि ५० हजार कर्ज लाभ घेऊ शकतो.

ही योजना २०२० साली १ जून ला आमलात आणली असून पात्र लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ एका परिवारातील एकच सदस्य घेऊ शकतो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणते लाभार्थी आहे पात्र

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही संपूर्ण भारतभरात राबविली जात आहे त्यामुळे भारतीय रहिवासी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्जदार हा रस्त्यावरील किरकोळ विक्रेता असायला हवा.

पात्र लाभार्थी या कर्जाची फेड फाफ्त्यामध्ये किंवा एकदाच सुद्धा करू शकतो.

करा ऑनलाईन अर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता.

या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला समोर समोर तीन पर्याय दिसेल लाभार्थी १० हजारासाठी २० हजारासाठी आणि ५० हजारासाठी अर्ज करू शकता.

तुम्हला जितक्या कर्जाची आवश्यकता ते निवडा.

पुढे राज्य निवडामध्ये other या पर्यायावर टच करा.

लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक खलील चौकटीत टाकून catpcha भरा.

त्यानंतर लाभार्थी या ठिकाणी दोन पद्धतीने पडताळणी करू शकतो. 1 पद्दत म्हणजे OTP आणि दुसरी पद्धत म्हणजे BIOMETRIC पद्धत.

वरीलपैकी OTP ची पद्धत सोपी आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल त्या पद्धतीने लॉगीन करा.

लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज दिसेल. अर्जामध्ये काही माहिती लाभार्थ्याला भरायची आहे.

अर्ज करताना कोणते कागदपत्रे लागणार आहे बघा खालीलप्रमाणे.

कागदपत्रे

लाभार्थ्याचे आधार कार्ड.

बँक पासबुक प्रत.

मतदान कार्ड.

रेशनकार्ड.

पासपोर्ट फोटो.

अशा प्रकारे तुम्ही या प्रधानमंत्री स्वनिधी योजनासाठी अर्ज करू शकता.

Leave a comment