या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचा 2100 रुपयांचा हफ्ता मंत्र्यांनी दिली माहिती

तुम्ही जर लाडकी बहिण योजनेचा तर पुढील हफ्ता कधी येणार या संदर्भात तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागलेली असेल.

आता हि उत्सुकता संपलेली असून लाडकी बहिण योजना पुढील हफ्ता २६ जानेवारी पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हि माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना हफ्ता वितरीत करण्यासाठी लागणारा निधी ३६९० कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे ज्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी हि खुशखबर आहे कारण २१०० रुपयांचा हफ्ता लवकरच पत्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीने म्हणजेच Direct benefit transfer पद्धतीने वर्ग केला जाणार आहे.

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला होणार बाद

ज्या महिलांनी पात्र नसतांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ज्या अटी आणि शर्थी आहेत त्यानुसार पात्र महिलांनाच केवळ यापुढे लाभ मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये पात्र नसतांना देखील अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते.

त्यामुळे आता जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांना बाद केले जाणार असून केवळ पात्र लाभार्थीच्या बँक खात्यामध्येच प्रती महिना २१०० याप्रमाणे डीबीटी पद्धतीने पैसे पाठविले जाणार आहे.

लाडकी बहिण योजनेचा हफ्ता २१०० रुपये २६ जानेवारी २०२५ पर्यंत पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असलायची अधिकृत माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment