शेतकऱ्यांसाठी आता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे ही पिक पाहणी कशी करायची यासाठी ऑनलाईन पद्धत कशी आहे कोणती एप्लीकेशन वापरावे लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ऑनलाइन पद्धतीने ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वर मिळून जाईल. जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन पहिलेच डाउनलोड असेल तर प्लेस्टोर वर जाऊन तुम्हाला या ॲप्लिकेशनची लेटेस्ट अपडेट डाउनलोड करायचे आहे.
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करावे लागणार आहे किंवा नवीन खाते तयार करावे लागणार आहे हे खाते नवीन कसे तयार करायचे ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही परमिशन्स मागण्यात येईल त्या परमिशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे.
या सर्व परमिशन्स दिल्यानंतर आता तुम्हाला डाव्या साईडला स्वाईप करायचे आहे.
ई पीक पाहणी सुरू बघा ऑनलाइन पद्धत
खरीप हंगाम ऑनलाईन ई पीक पाहणी करण्यासाठी या ठिकाणी तारीख सुद्धा ठरवून देण्यात आलेली आहे ही तारीख 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर इथपर्यंत आहे म्हणजेच 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहे आणि पहिला पर्याय म्हणजे शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करायचे आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जर तुम्ही पहिले या ॲपद्वारे पिक पाहणी केली असेल तर तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे जो मोबाईल क्रमांक तुम्ही मागच्या वेळेस किंवा पहिल्या वेळेस या ठिकाणी वापरला होता. या ठिकाणी नवीन मोबाईल क्रमांक वापरण्यासाठी सुद्धा काही अडचण येणार नाही.
आता या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे जर या ठिकाणी तुम्ही या अगोदर पीक पाहणी केली असेल तर खातेदाराचे नाव आपोआप या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
ही माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सांकेतांक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्हाला हा सांकेतांक क्रमांक माहीत नसेल किंवा तुम्ही विसरला असाल तर या खाली लाल कलर मध्ये तुम्हाला सांकेतांक क्रमांक विसरला असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा क्रमांक बघू शकता.
या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या खालच्या हिरव्या बटणावर म्हणजेच नवीन खातेदार नोंदणी करा यावर सुद्धा क्लिक करू शकता हे फक्त नवीन लाभार्थ्यांसाठी आहे.
अशा पद्धतीने नोंदवा ऑनलाईन माहिती
आता या ठिकाणी तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील त्यापैकी जर तुम्हाला कायम पण चालू पण नोंदवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
या ठिकाणी जर तुम्हाला तुमची पिक माहिती नोंदवायची असेल तर दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा पीक माहिती नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.
आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की खाते क्रमांक, गट क्रमांक व हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे.
या खाली तुम्हाला अशाच प्रकारची काही माहिती विचारल्या जाणार नाही जसे की तुम्ही बहु पीक घेता किंवा एकच पीक घेता किंवा कोणते कोणते पीक घेता या ठिकाणी तुम्हाला ही माहिती नोंदवायची आहे यानंतर तुम्हाला पिकांचा फोटो काढून अपलोड करावा लागणार आहे.