शासनाने रेशनसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने मेरा ई-केवायसी अॅप कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करता येणार आहे.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-KYC हे ॲप सुरू केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या रेशनसाठी ई-केवायसी पूर्ण करता येईल.
मुख्य वैशिष्ट्ये
- घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा.
- फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.
- रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.
- आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक.
ई-केवायसी कशी करावी? (Step-by-Step मार्गदर्शन)
१) प्ले स्टोअरवरून खालील दोन ॲप डाउनलोड करा.
- Mera E-KYC Mobile App खालील लिंकवरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
- Aadhaar Face RD Service App खालील लिंकवरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
२) ॲप इन्स्टॉल करून सेटअप करा.
- दोन्ही ॲप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या.
३) Mera E-KYC ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.
- राज्य : महाराष्ट्र निवडा.
- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- कॅप्चर : दिलेल्या कोडची नोंद करा.
४) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)
- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.
- स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
- दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.
५) सत्यापन पूर्ण
- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.
- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये “E-KYC Status” तपासा.
- जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अत्यंत महत्त्वाचे
- ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
- महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा.
- शेवटची तारीख : ३१ मार्च २०२५ (परंतु २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी).
रास्त भाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये.