Fal Pik Vima : राज्यातील फळ पिक विमा योजनेच्या (Fruit Crop Insurance) प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मृगबहार 2023-24-25 तसेच आंबिया बहार 2023-24-25 या चारही हंगाम करता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि अग्रीम स्वरूपातील हप्ता पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांचाफळ पिक विमा (Fal Pik Vima) मंजूर आहे. परंतु निधीच्या कारणामुळे वितरित करण्याला विलंब लागला. या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात 2023 24 या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम अर्थात मृगबहार दुष्काळी परिस्थिती अनुभवास मिळाली आणि आंबिया बहार या हंगामात काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले.
काही भागांमध्ये हा फळ पिक विमा मंजूर देखील झालेला होता. परंतु पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचे कारण सांगून या फळ पिक विम्याचे वितरण केले जात नव्हते. आता याच पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये आंबिया बहर 2024-25 चा अग्रीम स्वरूपाचा 159 कोटीचा तसेच मृगबहार 2024-25 चा 26 कोटी रुपयांचा तर आंबिया बहार 2023-24 चा उर्वरित हप्ता दहा कोटी रुपयांचा तर साधारणपणे मृगबहार 2023-24 या हंगामातील सहा ते सात लाख रुपयांचा उर्वरित निधी देखील प्राप्त झाला आहे.
याबाबतचे महत्त्वाचे निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. शासनाकडून ही रक्कम पिक विमा कंपन्यांना अनुदान हप्ता म्हणून वितरित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे फळ पिक विमा मंजूर झाले आहेत, पिक विमा सुद्धा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात आलेला नाही. अनेकदा कारण सांगून हप्ता वितरणास विलंब लावल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाकडून निधी मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता वितरित करावा लागणार आहे.