Namo Shetkari Yojana 2025 १० मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात महिलांना आणि शेतकरी वर्गाला काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Namo Shetkari Yojana 2025)
यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवण्याची घोषणा होऊ शकते. याचसोबत शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाणार आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांचे मानधन वाढवण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना वाढीव ३००० रुपये दिले जाण्याबाबत घोषणा होऊ शकते.
सध्या नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. या रक्कमेत आता ३००० रुपयांनी वाढ केली जाऊ शकते.याबाबत मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती. (Namo Shetkari Yojana 2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होती की, केंद्र शासन पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देतात. तर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेत ६ हजार रुपये दिले जातात.आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार आहे. यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना ९००० रुपये देणार आहे. पीएम किसान निधीचे ६००० आणि नमो शेतकरी योजनेचे ९००० रुपये असे १५००० रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा
आता राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेचा निधी वाढवला जाऊ शकतो. या योजनेत शेतकऱ्यांना कदाचित ९००० रुपये मिळू शकतात.