E pik Pahani राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी आणि विविध योजनांचा लाभ वेळेवर पोहोचावा, यासाठी ई-पीक पाहणी योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी आणि विविध योजनांचा लाभ वेळेवर पोहोचावा, यासाठी ई-पीक पाहणी योजना सुरू करण्यात आली आहे. E pik Pahani
ई-पीक पाहणीसाठी अंतिम मुदत
रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी स्तरावर स्वतः नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 होती. त्यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान पूर्ण करण्यात आली.
शेतकऱ्यांना आता त्यांच्या ई-पीक पाहणीची स्थिती जाणून घेण्यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही.त्यांनी नोंदणी केली आहे की नाही, हे ते मोबाईलवरच पाहू शकतात.
ई-पीक पाहणीची स्थिती मोबाईलवर कशी तपासावी?
शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे का, याची पडताळणी करण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबावी लागेल: E pik Pahani
1) सर्वप्रथम अॅप डाउनलोड करा
ई-पीक पाहणी अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.अॅप इन्स्टॉल करून आवश्यक परमिशन द्या. नन्यत्र अॅप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा आणि सर्व परवानग्या (Permissions) Allow करा.
2) महसूल विभाग निवडा
अॅप उघडल्यावर तुम्हाला महसूल विभाग निवडण्याचा पर्याय दिसेल.
तुमच्या जिल्ह्याचा महसूल विभाग निवडा आणि पुढील टप्प्यावर जा.
3) शेतकरी लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा
लॉगिन करण्यासाठी शेतकरी म्हणून पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.जर खाते क्रमांक आधीच लिंक केले असेल,तर तो निवडा.
जर खाते क्रमांक जोडले नसेल, तर आवश्यक माहिती भरून तो जोडा.
5) पिन (PIN) टाका
खाते क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला चार अंकी संकेतांक (PIN) टाकण्यास सांगितले जाईल. संकेतांक विसरला असल्यास, ‘संकेतांक विसरलात?’ या पर्यायावर क्लिक करून नवीन संकेतांक मिळवा. E pik Pahani
6) गावातील खातेदार यादीतून तुमचे नाव शोधा
पुढील टप्प्यावर तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील.
यादीतून तुमचे नाव शोधा आणि डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा.
तिथे तुमची ई-पीक पाहणी झाली आहे की नाही,याची माहिती मिळेल.
नवीन नोंदणी कशी करावी?
ज्या शेतकऱ्यांनी आधीच ई-पीक पाहणी अॅपद्वारे स्वतः नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी हे तपासणे सोपे आहे.ज्यांनी नवीन नोंदणी करायची आहे, त्यांना संपूर्ण माहिती भरून ती पूर्ण करावी लागेल. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आणि पिकांचा त्वरित तपशील उपलब्ध होण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली एक महत्त्वाचे डिजिटल साधन ठरत आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी.