राज्यातील ५२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे २,२१६ कोटी रुपये जमा केले जाणार आहे त्यासाठी शासनाने निधी वितरीत केला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षी एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेता आला त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी एका रुपयात पिक विमा काढला आहे अशा ५२ लाख शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कमेपोटी २,२१६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
त्यापैकी 1,१७५ कोटी रुपयाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना महिन्याभरात वितरीत करण्यात येणार आहे. ५२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
या वर्षी सुरुवातीला दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाने भाग पडले त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची मोठी अपेक्षा आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनाने वाढीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.