छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर ताकुल्यातील सव्वालाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी पिक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
या खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुसकान झाले त्यासाठी शेतकऱ्यांना ४६ कोटी ६९ लाख रुपयाचा पिक विमा मंजूर केला आहे.
तालुक्यातील 1 लाख २० हजार ४६९ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाई मंजूर झाली असून यासाठी तब्बल ४६ कोटी ६९ लाख ७ हजार ५१८ रुपये रक्कम मंजूर झाली आहे.
सदरील रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जन करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
या वर्षी खरीप हंगामात जुलै माहिती पावसाचा मोठा खंड पडल्याने मक्का कपाशी यासह विविध पिकाचे नुकसान झाले त्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून शासने २५ टक्के अग्रिम पिक विमा मंजूर केला आहे.
सव्वालाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी
तालुक्यातील सव्वालाख शेतकऱ्याच्या बँक खात्यावर ४६ कोटीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु आहे काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे संदेश देखील आले आहे.
तालुक्यामधील काही शेतकऱ्यांना अजून पिक विम्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असून त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वैजापूर तालुक्यातील १० महसूल मंडळातील 1 लाख २० हजार ४६९ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विम्याचे ४६ कोटी ६९ लाख 77 हजार ५१८ रुपये मिळणार आहे.
मक्का पिकला ६ हजार ८०० रुपये तर कपाशी पिकला 9 हजार ३९० रुपये हेक्टरी मिळणार असा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.