Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी वर्षाचा शेवट गोड, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत ३५ लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. (Ladki bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते.त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.

महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते देण्यात आले आहे. खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महिलांना पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. (Ladki bahin Yojana New Update)

२१०० रुपये कधीपासून?

लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेत महिलांना लवकरच २१०० रुपये दिले जाणार आहे. मात्र, हे पैसे कधीपासून दिले जाणार आहेत, याची तारीख समोर आलेली नाही. दरम्यान, महिलांनो, मार्चपर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्हाला २१०० रुपये दिले जातील, असं आदिती तटकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे मार्चनंतर तुम्हाला २१०० रुपये मिळणार आहे.

Leave a comment