या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८१२ कोटींची भरपाई मंजूर Crop Damage insurance

Crop Damage  insurance नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. हा भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, यासाठी ‘ॲग्रोवन’ने पाठपुरावा केला होता. Crop Damage insurance

नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आदेश दिले होते. Crop Damage insurance

यानुसार जिल्ह्यात पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती.

या मागणीनुसार शासनाने मंगळवारी (ता. १०) नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, नुकसान भरपाई मिळण्याच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हा निधी मिळण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. हा निधी शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, यासाठी अॅग्रोवनने सतत पाठपुरावा केला होता.

…अशी मिळणार रक्कम

राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविले आहेत. यात जिरायतीसाठी साडेआठ हजारांवरून तेरा हजार पाचशे रुपये, बागायतीसाठी १७ हजारांवरून २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार पाचशे रुपयांवरून ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर करण्यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही दोन हेक्टरवरून तीन हेक्टर वाढविली आहे.

तालुकानिहाय प्राप्त निधी

  • नांदेड-२९.८५ कोटी,
  • अर्धापूर-३२.९७ कोटी,
  • कंधार-७१.२७ कोटी,
  • लोहा-८४.४० कोटी,
  • बिलोली-५६.६४ कोटी,
  • देगलूर-५०.९५ कोटी,
  • मुखेड-५५.९२ कोटी,
  • नायगाव-५६.६४ कोटी,
  • धर्माबाद-२७.२६ कोटी,
  • उमरी-३२.७० कोटी,
  • भोकर-५२.१९ कोटी,
  • मुदखेड-२९.३५ कोटी,
  • हदगाव-८२.२७ कोटी,
  • हिमायतनगर-४४.६१ कोटी,
  • किनवट-८०.४२ कोटी,
  • माहूर-३५.१२ कोटी.

Leave a comment