PM Kisan Yojana केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. पुढच्या महिन्यात या योजनेचा १९वा हप्ता येऊ शकतो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. (PM Kisan Yojana Rules)
पीएम किसान योजनेचा लाभ जर पती पत्नी दोघेही घेऊ शकतात?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन २ हेक्टरपर्यंत आहे. त्याचसोबत शेतीयोग्य जमीन असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमिनीची नोंदणी आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांनुसार, या योजनेत जर एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही लाभ घेऊ शकत नाही. फक्त ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. (PM Kisan Yojana)
पुढचा हप्ता कधी येणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो.दर चार महिन्यानी या योजनेचा हप्ता दिला जातो. मागचा १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला गेला होता. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहे.