Vihir Yojana : विहीर योजनेत मोठा बदल, आता ‘हे’ शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर

Vihir Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) अंतर्गत पाच लाख रुपयांच्या अनुदान मर्यादेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते. याच योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा बदल आज 8 जानेवारी 2025 रोजी एकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

याबाबत शासनाच्या माध्यमातून नवीन निर्णय (Government GR) निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसारइंदिरा आवास योजना (Indira Awas Yojana) आता प्रधानमंत्री आवास योजनेत विलीन करण्यात आली आहे. भोगवटदार वर्ग २ जमिनी करणारे शेतकरी सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर 2022 च्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या ज्या काही एसओपी आहेत, यात बदल करण्यात आला आहे. Vihir Yojana

या निर्णयानुसार ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड करत असताना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत. या लाभार्थ्याच्या अटी ऐवजी आता नवीन प्राधान्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थी असतील. आता घरकुल योजनेचे लाभार्थी या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत.

भोगवटादार वर्ग २ च्या जमीन धारण करणारे

याचबरोबर योजनेच्या अंतर्गत लाभधारकाची पात्रता असेलेले लाभार्थी आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांमध्ये लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी, ज्यांच्याकडे जमीनी भोगवटादार वर्ग दोनच्या आहे. भोगवटादार वर्ग २ च्या जमीन धारण करणारे भूधारक देखील या विहिरी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत. यामुळे एससी, एसटी, ओपन, ओबीसी प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग २ ची जमीन असेल तरीसुद्धा विहिरीच्या अनुदानासाठी लाभासाठी पात्र असणार आहे. Vihir Yojana

जी. आर पहा

Leave a comment