या ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीकविमा रक्कम जमा यादी प्रसिद्ध Vima Final List

Vima Final List पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता अग्रीम २५% रक्कम जमा होत असल्याचे आपण पाहत आहे.यातच आता २४१ कोटी रुपयांचा निधी हा सुमारे ०७ लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली असून सविस्तर माहिती व यादी देखील खाली देण्यात आली आहे

शेतकरी मित्रांनो अग्रीम पीकविमा पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील 47 लाख ६३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पिकविम्याची तब्बल ९६५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पीकविमा रक्कम दिली जाणार असल्याचा शब्द कृषीमंत्र्यांनी दिला होता यानुसार ज्या १२ जिल्ह्यातील पीकविमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला न्हवता अशा जिल्ह्यतील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच २५% अग्रीम पीकविमा दिला आहे.

बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता बीड जिल्ह्यातील सर्व मंडळात पंचनामे करण्यात आले असून त्यानुसार जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता पिक विम्याचे २५% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

  • ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने पीकविमा भरला होता.
  • ज्या मंडळात किंवा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे असे शेतकरी
  • सलग २१ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पाऊस नाही अशा गावातील शेतकरी
  • ई पिक पाहणी नोंदणी केलेले शेतकरी
  • आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणारे शेतकरी.Pik Vima Final List

Leave a comment