Solar Vendor Selection : सोलर योजनेत कंपन्यांचा कोटा संपला? आता शेतकऱ्यांना पंप मिळणार कि नाही? जाणून घ्या सविस्तर

Solar Vendor Selection : मागेल त्याला सोलर पंप योजनेत (Solar Pump Yojana) सध्या काहीशेतकऱ्यांचे जॉईंट सर्वेसुरु आहे. काही शेंतकऱ्यांचे व्हेंडर निवडीची प्रक्रिया सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांचे पेमेंटची प्रक्रिया सुरु आहे. अशा स्थितीत व्हेंडर निवडीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

कारण सद्यस्थितीत या योजनेच्या वेबसाईटवर व्हेंडर निवडीसाठी (Solar Scheme Vendor Selection) आता कंपन्यांचा कोटा संपला असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण जे शेतकरी व्हेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, याबाबतीत पुढे काय होईल, हे आपण या लेखातून समजून घेऊया…

मागेल त्याला सोलर पंपयोजनेचे पेमेंट केल्यानंतर व्हेंडरची Solar Vendor Selection) पर्याय येतो आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी व्हेंडर निवड (Vendor List) देखील केली आहे. शिवाय त्यानंतरची जॉईंट सर्व्हेची प्रक्रिया देखील केली जात आहे. आता मागेल त्याला सोलर पंप योजनेत काही कंपन्यांची निवड करण्यात आली होती. या कंपन्यांची निवड केल्यानंतर याच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवले जाणार आहेत.

काही कंपन्यांचा कोटा पूर्ण?

दरम्यान ठरविण्यात आलेल्या कंपन्यांना काही कोटा ठरवून देण्यात आलेला आहे. म्हणजेच एवढ्याच शेतकऱ्यांना संबंधित कंपनी निवडण्याचा पर्याय उपलब्ध राहील, आता कंपन्यांचा कोटा पूर्ण होत आला आहे. मात्र दुसरीकडे शेतकरी व्हेंडर निवडीपासून वंचित आहेत. त्यामुळे हे शेतकरी धास्तावले आहेत. आता आम्हाला व्हेंडर निवड करता येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून ठरविण्यात आलेल्या कंपन्यांचा कोटा पूर्ण होत आला आहे. तर काही कंपन्या अद्यापही शिल्लक आहेत.

घाबरून जाऊ नका…

आता कंपन्यांचा कोटा पूर्ण झाला असला आणि शेतकरी व्हेंडर निवडीपासून वंचित असले तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण काहीच दिवसांत पुन्हा एकदा संबंधित कंपन्यांना कोटा वाढवून देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांना पसंतीची व्हेंडर निवड करायची असेल तर करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही धास्ती न ठेवता या योजनेच्या वेबसाईटचा पाठपुरावा करायचा आहे, जेणेकरून व्हेंडर लिस्ट नव्याने उपलब्ध झाल्यानंतर व्हेंडर निवड सहजपणे करता येईल.

Leave a comment