Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Update : राज्यातील अनेकशेतकरी योजना या महाडीबीटी पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून राबवल्या जातात. या पोर्टलवर अर्ज केलेल्या आणि पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र अनेक योजनांबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचं चित्र आहे. योजनांचे लॉटरी न लागणे, लागलेल्या लॉटरीचे पूर्वसंमती न देणे आणि अनुदानाचा वितरण न होणे अशा सर्व बाबी सध्या सुरू आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विहीर योजनेत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत शेतकऱ्यांकडून या योजनेची लॉटरी कधी लागणार याबाबत विचारणा होत आहे. यामध्ये पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादन, बियाणे अर्ज योजना सिंचन, तुषार अशा योजना (Agriculture Scheme) आहेत.

या योजनांसाठी केंद्र शासनाकडून (Central Government) निधी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातून काही जुन्या योजनांचा अनुदान विपरीत करण्यात आले, मात्र नवीन योजनांचे काय? तर याबाबत आता शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. Mahadbt Update

दरम्यान या योजनांमध्ये सौरचलित फवारणी यंत्र या योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या योजनेबाबतचे मॅसेज येण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला मेसेज येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन याची शहानिशा करायची आहे. Mahadbt Update

जर शासन लॉटरी अनुदान वितरण वितरित करणार असेल तर याबाबत पूर्वसंमती घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करेल. तोपर्यंत शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे.

Leave a comment