PFMS Payment Status तुम्ही एखाद्या अनुदानाची (Subsidy) वाट पाहत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का? किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, पण ते नेमके कशाचे झालेत हे लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे अनुदान येणार होतं ते आले का? किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहेत, ते कशाचे आहेत? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर निवडक अनुदानाचे पैसे येत आहेत. पिक विमा (Pik Vima) असेल अतिवृष्टी अनुदान असेल कृषी सिंचन योजना (Krushi Sinchan Yojana) असेल किंवा या व्यतिरिक्त शासनाच्या इतर योजनांचा अनुदान असेल डीबीटी द्वारे अनुदानाचे वितरण केले जात आहे. PFMS Payment Status
दरम्यान मध्यंतरी शासनाचा एक जीआर आला होता. यात 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे ज्यात विदर्भ, मराठवाडा (Marathwada) यासह इतर जिल्हे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे रेशन बंद करून शेतकऱ्यांना रोख स्वरूपात प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. PFMS Payment Status
या योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व योजनांच्या अनुदानाच्या वितरणामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. नेमकं कुठलं अनुदान खात्यात जमा झाले, हे लक्षात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत, तर हे कसं जाणून घ्यायचं ते पाहूयात….
अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
- यासाठी सर्वप्रथम https://pfms.nic.in/ या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जायचं आहे.
- यातील चौथा पर्याय म्हणजेच पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचा आहे यातील.
- नो युवर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये पेमेंट बाय अकाउंट नंबर अशी विंडो दिसेल.
- यात सुरवातीला आपण वापरत असलेल्या बँकेचे नाव, (यात आपल्यासमोर बँकांचा यादी दाखवली जाईल, यातून आपली बँक निवडायची आहे.)
- यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करण्यासाठी पुन्हा बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे.
- यानंतर खालील बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाकायचा आहे.
- यानंतर आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
- हा ओटीपी त्या रकान्यात टाकायचा आहे. व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- यानंतर आपल्या खात्यावरील माहिती आपल्याला खाली पूर्ण स्वरूपात दाखवली जाईल.
- यात कोणत्या योजनेचे अनुदान, कोणत्या दिवशी आले आहे, किती आले आहे? हा सर्व तपशील दाखवला जाईल.
- अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रत्येक अनुदानाची माहिती उपलब्ध होईल.